Wayanad Loksabha By-Election: भाजपने वायनाडचा उमेदवार ठरवला, प्रियांका गांधींसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या हरिदास कोण आहेत?

Priyanka Gandhi Vs Navya Haridas: केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. कोण आहे नव्या हरिदास घ्या जाणून...
Wayanad Loksabha By-Election: भाजपने वायनाडचा उमेदवार ठरवला, प्रियांका गांधींसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या हरिदास कोण आहेत?
Priyanka Gandhi Vs Navya HaridasSaam Tv
Published On

भाजपने नुकताच २५ विधानसभा आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने नव्या हरिदास यांना वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. याव्यतिरिक्त आसाममधील ३, बिहारमधील २, छत्तीसगडमधील १, कर्नाटकातील २, केरळमधील २, मध्य प्रदेशातील २, राजस्थानमधील ६ आणि पश्चिम बंगालमधील ६ विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नव्या हरिदास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नव्या हरिदास गेल्या दोन टर्मपासून कोझिकोड कॉर्पोरेशनच्या करापराम्प प्रभागातून नगरसेविका आहेत आणि त्या महामंडळात भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेत्या आहेत. २०२१ ची कोझिकोड दक्षिण मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसही आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात पाऊल ठेवणार असून त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. प्रियांका गांधी याचा भाऊ आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पद सोडल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली आणि केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी वायनाडचे पद सोडले होते.

Wayanad Loksabha By-Election: भाजपने वायनाडचा उमेदवार ठरवला, प्रियांका गांधींसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या हरिदास कोण आहेत?
PM Narendra Modi Speech : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पेक्षा मोठी श्रद्धांजली काय असेल; निवडणुकांच्या निकालावर PM मोदी काय म्हणाले? VIDEO

राहुल गांधींनी पद सोडल्यानंतर या ठिकाणावर काँग्रेसकडून कोण निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. शेवटी काँग्रेसने प्रियांका गांधींचे नाव जाहीर केले. प्रियांका गांधी 23 ऑक्टोबर रोजी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी प्रियांका गांधी रोड शो करणार आहेत.

झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच १४ राज्यांतील ४८ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे आणि दोन राज्यांतील लोकसभेच्या २ जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखा आहेत. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे केरळची वायनाड लोकसभा जागाही रिक्त झाली आहे. यूपीमधील ९ जागांसह १३ राज्यांतील ४७ विधानसभा जागांसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केरळमधील वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचवेळी उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभा जागेवर आणि महाराष्ट्राच्या नांदेड लोकसभा जागेवर २० नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.

Wayanad Loksabha By-Election: भाजपने वायनाडचा उमेदवार ठरवला, प्रियांका गांधींसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या हरिदास कोण आहेत?
Rahul Gandhi News: 'हरियाणाचा निकाल अनपेक्षित...', अखेर राहुल गांधी बोलले; काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com