Amit thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

mns Second list for maharashtra assembly election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अमित ठाकरे यांनाही स्थान मिळालं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी ४५ नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने ४५ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीतील दोन नावे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले होते. राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची नावे राज ठाकरेंनी जाहीर केली होती. त्यानंतर आता मनसेने अमित ठाकरे यांनाही उमेदवारी जाहीर केली.

अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास उद्धव ठाकरे पाठिंबा देतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

पुण्यात कुणाला मिळाली उमेदवारी?

मनसेने वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदिप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर केली आहे. मयुरेश वांजळे हे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा पुत्र आहेत. तर सोनेरी आमदार म्हणून रमेश वांजळे यांची ओळख होती. तोच वारसा पुढे घेत मयुरेश वांजळे सुद्धा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर हडपसरमधून साईनाथ बाबर यांच्यासह कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

दरम्यान, मुरबाड मतदारसंघात मनसेकडून संगीता चेंदवणकर यांना उमेदवारी मिळाली. बदलापूर अत्याचार प्रकरणाला वाचा फोडण्यात चेंदवणकरांनी मोठी भूमिका निभावली. उमेदवारीच्या रूपात त्यांना राज ठाकरेंकडून बक्षीस मिळाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer: कॅन्सरची ही लक्षणं शरीरात लपलेली असतात

Curly Hair Care: कुरळ्या केसांसाठी कधीच वापरू नका या ७ गोष्टी, नाहीतर तुमचे केसं कायमचे होतील कोरडे आणि निर्जीव

Cyclone Alert! धोक्याचा इशारा! २४ तासात चक्रीवादळ धडकणार, IMD चा नवा अलर्ट काय?

Maharashtra Dasara Melava Live Update: ज्यांचे शेतं आणि पिक वाहून गेलं 1 लाख 30 हजार रुपये भरपाई द्यायची- मनोज जरांगे

Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

SCROLL FOR NEXT