Nilesh Rane to join shivsena : दोन दशकानंतर निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार; कुडाळमधून ठाकरेंना देणार आव्हान? VIDEO

Nilesh Rane Latest news : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कोकणात मोठा राजकीय संघर्ष दिसून येतोय. तब्बल २० वर्षानंतर माजी खासदार निलेश राणे हाती धनुष्यबाण घेणार आहेत. कुडाळमधून ते निवडणुक लढणार आहेत. पाहूया एक रिपोर्ट...
दोन दशकानंतर निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार; कुडाळमधून ठाकरेंना देणार आव्हान?
Nilesh Rane and uddhav thackeraysaam tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला ठाकरे गटाची कोकणात पिछेहाट झाली. आता विधानसभेसाठी ठाकरे गट जोर लावत असतानाच ठाकरेंचे राजकीय शत्रू राणेंनी मोठा डाव टाकलाय. माजी खासदार निलेश राणे हाती शिवबंधन बांधणार आहेत. तब्बल २० वर्षानंतर राणेंच्या हाती धनुष्यबाण येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली. 'नारायण राणेंनी ज्या चिन्हावर राजकारणात सुरुवात झाली, त्याच चिन्हावर मी आता निवडणूक लढवणार असल्याचे निलेश राणे म्हणाले.

भाजपमधून शिवसेनेत जाणाऱ्या निलेश राणेंनी भाजप नेत्यांचं गुणगाण गायलय. देवेंद्र फडणवीसांनी लहान भावाप्रमाणे सांभाळलं. रवींद्र चव्हाण यांनीही लहान भावाप्रमाणे वागणूक दिली. सगळ्याच नेत्यांनी चांगली वागणूक दिली हे सांगायला निलेश राणे विसरले नाहीत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहतील, असेही त्यांनी म्हटलंय.

दोन दशकानंतर निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार; कुडाळमधून ठाकरेंना देणार आव्हान?
VIDEO: Kudal मध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आपआपसात भिडले

कुडाळमधून निलेश राणे निवडणूक लढणार आहेत. कुडाळ मतदारसंघ हा नारायण राणे यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र सलग दोन वेळा या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक निवडून आले होते. त्यांनी २०१४ मध्ये नारायण राणे यांचा परभाव केला होता. तर २०१९ मध्ये भाजपच्या रणजीत देसाई यांना धूळ चारली होती.

दोन दशकानंतर निलेश राणे धनुष्यबाण हातात घेणार; कुडाळमधून ठाकरेंना देणार आव्हान?
Nilesh Rane : नीलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार,VIDEO

कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्याना मिळून कुडाळ मतदारसंघ तयार झाला असून यंदा बदलत्या राजकीय समिकरणामुळे मतदारसंघात शिवसेना विरुध्द शिवसेना लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com