Amit Shaha Saam Tv
मुंबई/पुणे

गृहमंत्री अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, खासदाराचा पीए म्हणून घुसला ताफ्यात; पोलिसांनी केली अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान या व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

यादरम्यान, त्या व्यक्तीने अमित शहा यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पवार नावाचा हा व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे भासवत होता. शहा यांच्या मुंबई दौऱ्यात हेमंत पवार या व्यक्तीने अधिकारी असल्याचे भासवून अमित शहा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या आरोपात पोलिसांनी (Police) हेमंत पवार याला भादंवि कलम १७० आणि कलम १७१ अन्वये अटक केली आहे.

अमित शहा (Amit Shaha) ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर शहा भाजपच्या नेत्यांची बैठक घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे गेले. यावेळी त्यांच्याभोवती फिरणारी व्यक्तीही सागर बंगल्यात घुसली. आरोपीच्या गळ्यात ओळखपत्र होते.

त्यामुळे कोणाला संशय आला नाही. काही वेळाने मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नजरेस पडल्यावर ते संशयास्पद वाटले. यावेळी अधिकाऱ्यांनी मलबार हिल पोलिसांनी ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने अधिकृत एमएचएचा बँड मिळाला असल्याचा दावा केला आहे. याची पुढील चौकशी सुरू आहे.

हे देखील पाहा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहा (Amit Shaha) सोमवारी मुंबई दौऱ्यावर असताना गिरगावात पोलीस बंदोबस्त पाहत असताना ही घटना घडली. सोमवारी गृहमंत्री अमित शहा मलबार हिलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानांना भेट देणार होते.

अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातलेला एक व्यक्ती दिसला. त्यांनी गृह मंत्रालयाचे ओळखपत्रही लावले होते. “तो व्यक्ती प्रतिबंधित परिसरात फिरत होता. काही तासांनंतर शहा हे एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले, तेव्हा तो व्यक्ती तेथेही तेथे दिसला. तेव्हा त्या व्यक्तीची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव हेमंत पवार असल्याचे सांगितले आणि आपण केंद्रीय एजन्सीचा सदस्य असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Paratha Recipe : पालकांनो सकाळी मुलांना घाईगडबडीत द्या पौष्टिक नाश्ता, झटपट बनवा 'पालक पराठा'

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT