Amit Shah Pune News
Amit Shah Pune News saam tv
मुंबई/पुणे

Amit Shah News: श्रीसदस्यांच्या जाण्याने माझे मन जड झाले; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर अमित शहांचं ट्विट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amit Shah News: नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवलेल्या काही श्रीसदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. उष्माघाताने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील याच दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तसेच अमित शहा यांनी या कार्यक्रमात डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार देखील केला होता. मात्र, या कार्यक्रमात उष्माघाताने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेवर अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 'काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे.मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो'.

नवी मुंबईतील खारघर (Kharghar) येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावलेल्या श्रीसदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे.

उष्माघातामुळे सोमवारी आणखी दोन श्री सदस्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 वर पोहचला आहे. कल्याण आणि विरारमध्ये राहणाऱ्या श्रीसदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

SCROLL FOR NEXT