Amit Shah Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडेच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.
पुणे विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.
आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा होणार नसल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र शाह यांच्या या दौऱ्यात युती सरकाराच्या मंत्रिमंडळ विस्तारावाबाबत चर्चा होऊ शकते, असं सूत्रांचं म्हणणं आहे. (Latest Marathi News)
कसा असेल अमित शाह यांचा दौरा?
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार , 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS) कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सहकार से समृद्धी " या संकल्पनेत ठाम विश्वास दर्शवत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या अनुषंगाने , सहकार क्षेत्रात व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण केले जात आहे.
दरम्यान, रविवारी अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे चिंचवड येथील वाहतुकीत बदल केल्याची माहिती पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. ते म्हणाले नागरिकांनी वाहतुकीच्या बदलाची नाेंद घ्यावी. तसेच पाेलिस दलास सहकार्य करावे.
जाणून घ्या वाहतुकीतल बदल
महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.
दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे.
पर्यायी मार्ग: वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.
रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.
हा सर्व बदल रविवारी (उद्या, ता. ६) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे असेही (traffic) पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.