मुंबई भाजप अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची नियुक्ती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली.
दोन ते तीन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार.
अमित साटम यांच्या नेतृत्वाचा भाजपला फायदा होऊ शकतो.
Amit Satam appointed BJP Mumbai President : मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपकडून मुंबई अध्यक्षांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज मुंबईमध्ये भाजपची बैठक पार पडली. त्यामध्ये आमदार अमित साटम यांची मुंबई अध्यक्ष म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित साटम यांच्या नावाची घोषणा केली. दोन ते तीन महिन्यांमध्ये मुंबईमध्ये मनपाच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधी भाजपकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. अमित साटम यांची मुंबईवर चांगली पकड आहे, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. (Amit Satam appointed BJP Mumbai President ahead of BMC elections)
अमित साटम हे अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या नेतृत्वातच भाजप बीएमसी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नाची जाण आहे, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी सोपण्यात आल्याचे बोलले जातेय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साटम यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये महायुतीची सत्ता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोण आहेत अमित साटम ?
अमित साटम (Ameet Satam) हे मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय. अमित साटम यांचा जन्म मुंबईत झालाय. त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेतलेय. राजकारणात येण्यापूर्वी ते व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत होते. अमित साटम यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबईतील सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणून काम केलेय. अमित साटम हे एक सक्रिय आणि प्रभावी स्थानिक नेते म्हणून ओळखले जातात, जे मतदारसंघातील विकास आणि सामाजिक कार्यात योगदान देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.