अंबरनाथमध्ये भंगार व्यावसायिकावर तलवारीने जीवघेणा हल्ला
डोळ्यात मिरची पावडर फेकून तलवारीने वार
पोलिसांकडून कारवाई सुरू
अंबरनाथमध्ये भंगार व्यवसायातील स्पर्धेतून भंगार व्यावसायिक मोहम्मद मुस्तफा खान यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा परिसरात ही घटना घडली. मोहम्मद मुस्तफा खान हे दुकानातून घरी जात असताना सलमान शेख, इस्माईल शेख उर्फ ईच्चा आणि दिशान खान यांनी त्यांचा पाठलाग केला. शारदा चौक परिसरात आरोपींनी खान यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडलं. त्यानंतर शिवीगाळ करत आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली आणि तलवारीने हल्ला केला.
या हल्ल्यात खान यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेनंतर अंबरनाथ पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या तलवार हल्ल्यामुळे अंबरनाथमध्ये खळबळ माजली आहे. व्यवसायातील स्पर्धा थेट हिंसाचारापर्यंत पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
राहुरीच्या कृषी विद्यापीठ परिसरात तरुणाची निर्घृण हत्या
अहिल्यानगरमधील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात 26 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पा शेजारी कैलास पोपट दोंदे या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलाय. युवकाच्या तोंड आणि पायावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून येताय. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात राहुरी पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.