Shiv Mandir of Ambernath Saam TV
मुंबई/पुणे

Shiv Mandir of Ambernath: अंबरनाथमध्ये वालधुनी नदीने धारण केलं रौद्ररुप! प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्याखाली

Ambernath News: प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालंय.

साम टिव्ही ब्युरो

Ambernath Rain Update: शिव भक्तांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ शहरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरलं आहे. त्यामुळं प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंग पाण्यात बुडालंय. (Latest Marathi News)

अंबरनाथमध्ये (Ambernath) तब्बल ९६२ वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराला लागूनच वालधुनी नदी (Waldhuni River) वाहते. प्राचीन शिवमंदिरातून पिंडीवरील पाणी बाहेर जाण्यासाठी एक आऊटलेट थेट वालधुनी नदीत सोडण्यात आलंय. गेल्या २ दिवसांपासून अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वालधुनी नदीची पाणीपातळी वाढली आहे.

नदीचं हेच पाणी या आऊटलेटमधून थेट गाभाऱ्यात शिरलंय. त्यामुळे शिवलिंग देखील पाण्यात बुडाल्याचं पाहायला मिळालं. अशात मंदिरातील पुजाऱ्यांकडून शिवलिंगावरील मुखवटा, नाग सुरक्षेच्या दृष्टीने काढून ठेवण्यात आले आहेत.

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पालघर (Palghar) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पालघर, वसई, डहाणू,तलासरी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाराअनुसार पालघर जिल्याला पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे वसई विरारमधील शहरी आणि ग्रामीण भागातील सखल भाग पाण्याखाली गेले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, राहवाशी संकुलात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून नागरिकांना पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विरारमधिल नवा विवा कॉलेज रोड,आगाशी रोड,बोलींज रोडवरील प्रमुख रस्ते पूर्णता पाण्याखाली गेले आहेत.

नालासोपारामधिल सेंट्रल पार्क रोड,तुलिंज रोड, आचोले रोड येथील सखल भाग देखील पाण्याखाली गेले आहेत. सकाळपासून शहरात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल(NDRF)ची एक विशेष तुकडी शासनाने पालघर जिल्ह्यामध्ये पाठवली आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ही तुकडी लोकांच्या मदतीसाठी तत्पर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

SCROLL FOR NEXT