IMD Rainfall Alert: पुढील ४ दिवसांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट

Weather Updates In Maharashtra: हवामान खात्याने पुन्हा एकदा काही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Weather Updates In Maharashtra
Weather Updates In MaharashtraSaam TV
Published On

Maharashtra Weather Updates: गेल्या काही दिवसांपासून देशातील तापमानात मोठी चढउतार पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाचं हे संकट नेमकी कधी पाठ सोडणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा काही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  (Latest Marathi News)

Weather Updates In Maharashtra
Dombivali Crime News: इन्स्टाग्रामवरील मैत्री महिला पोलिसही फसली; लग्नाचे वचन देऊन तरुणाने केलं भलतंच कांड

येत्या तीन ते चार दिवसांत देशातील काही राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्याने पुन्हा एकदा बळीराज्याची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर पश्चिम भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  (Breaking Marathi News)

शनिवारी (२७ मे) सकाळच्या सुमारास सुद्धा अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Rain Alert) झाला. मात्र, मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यापासून लगेच दिलासा मिळणार नाही, उत्तर पश्चिम भारतातील राज्यांमध्ये २७ ते ३० मे दरम्यान मुसळधार पावसाचं थैमान सुरूच राहिल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

२७ मे रोजी आणि उत्तर राजस्थानमध्ये २८ आणि २९ मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याच दिवशी हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पावसाचा (Weather Updates) इशाराही देण्यात आला आहे. ईशान्यकडील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरामध्ये पुढील २४ तासांत जोरदार पाऊस होईल, त्यानंतर पावसाचा वेग कमी होईल, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात येत्या ४ दिवसांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर उन्हाचा कडाका देखील वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उन्हाच्या झळा जाणवतील. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com