ambernath, arrest, doctor, police Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra : दारू पिऊन मित्राला सांगितला किस्सा; 'तिच्या' सह नऊ जणांना पाेलिसांनी ठाेकल्या बेड्या

डॉक्टर लापसिया यांच्याकडेच पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेनं हा सगळा कट रचल्याचं समोर आलं आहे.

अजय दुधाणे

Ambernath News : अंबरनाथ (Ambernath) येथील डॉ. उषा लापसिया यांच्या घरावर जुलै महिन्यात सशस्त्र दरोडा पडला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी (police) तीन महिन्यांनी दरोडेखोरांचा माग काढत एका महिलेसह एकूण ९ जणांना बेड्या (arrest) ठोकल्या आहेत. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून पूर्वी डॉक्टर लापसिया यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेनंच हा कट रचल्याचं तपासातून समोर आले आहे. (ambernath latest marathi news)

अंबरनाथमधील डॉक्टर उषा आणि हरीश लापसिया यांचं कानसई दत्तमंदिराजवळ उषा नर्सिंग होम हे हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर लापसिया दाम्पत्य वास्तव्याला आहे. ११ जुलैला रात्री डॉ. हरीश लापसिया हे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असताना उषा लापसिया या रोजच्याप्रमाणे घराचं दार उघडं ठेवून झोपी गेल्या. (Breaking Marathi News)

यानंतर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी आधी तळमजल्यावरील पेशंट आणि नर्स यांना कोंडून ठेवलं. त्यानंतर लापसिया यांच्या घरात घुसून तिथून १ किलो सोन्याच्या दागिन्यांसाह रोख रक्कम, हिरे असा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल लुटून नेला. जाताना हे दरोडेखोर सीसीटीव्हीचा डिव्हीआरही घेऊन गेले.

त्यामुळं हे काम ओळखीतल्याच कुणाचं तरी असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र सर्व अंगांनी तपास करूनही ३ महिने शिवाजीनगर पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. त्यामुळं विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय हर्षल राजपूत यांच्याकडे तपासाची सूत्रं देण्यात आली. त्यानंरार राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांनी आरोपींचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या. (Tajya Batmya)

यामध्ये डॉक्टर लापसिया यांच्याकडेच पूर्वी काम करणाऱ्या एका महिलेनं हा सगळा कट रचल्याचं समोर आलं. ज्योती सालेकर ही महिला पूर्वी लापसिया यांच्याकडे लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होती. मात्र ती रुग्णांकडून परस्पर पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्यानं डॉक्टर लापसिया यांनी तिला कामावरून काढून टाकलं होतं.

याचाच राग काढण्यासाठी ज्योतीने तिच्या ओळखीच्या चेतन दुधाने, हरीश घाडगे, अक्षय जाधव, कुणाल चौधरी, दीपक वाघमारे, तुषार उर्फ बाळा सोळसे यांना सोबत घेत हा दरोड्याचा कट रचला आणि दरोडा टाकला. दरोडा टाकल्यानंतर जणू काही झालंच नसल्याच्या अविर्भावात हे सगळे वावरत होते. त्यात ३ महिने होऊनही पोलीस आपल्यापर्यंत न आल्यानं आता दरोडा पचवल्याच्या आनंदात हे सगळे होते.

मात्र त्याचवेळी त्यांच्यातल्याच एकाने दारू पिऊन मित्राला सांगितलेले किस्से थेट पोलिसांपर्यंत पोहोचले आणि हे सगळे थेट गजाआड पोहोचले. या सर्वांकडून चोरीचं सोनं विकत घेणारे बाबूसिंग चदाणा आणि गोपाल रावरिया या दोन ज्वेलर्स व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या कामगिरीची माहिती दिली.

या पत्रकार परिषदेला उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत हेदेखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर या गुन्ह्याची उकल करणारे पीएसआय हर्षल राजपूत आणि कॉन्स्टेबल मंगेश वीर यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाचा अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इतकंच नव्हे, तर या पथकाला ५० हजार रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलं. पोलिसांनी उशिरा का होईना, पण या गुन्ह्याची उकल केल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त होतंय. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Dream Astrology: स्वप्नात 'या' गोष्टी दिसणं असतं शुभ, धनलाभागाचे मिळतात संकेत

Sindhudurg Tourism : हिवाळ्यात सिंधुदुर्गमधील 'हे' अनोखं ठिकाण पाहा, आयुष्यभर ट्रिप विसरणार नाही

Sangli : सांगलीत 'मुळशी पॅटर्न'! दलित महासंघाच्या अध्यक्षांच्या हत्येनंतर आणखी एकावर हल्ल्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक, NCP शरद पवार गटाला झटका; बड्या नेत्यासह सरपंच-उपसरपंचांनी हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT