Grampanchayat Election Result 2022 : मुख्यमंत्री शिंदे गटाच्या आमदाराच्या गावातील सत्ता गेली; 'मविआ' चा धक्का

रविवारी राज्यात झालेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे एकेक निकाल हाती येऊ लागेल आहेत.
Grampanchayat Election Result 2022, Raigad
Grampanchayat Election Result 2022, Raigad saam tv

Grampanchayat Election Result 2022 : राज्यात रविवारी विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. आज (साेमवार) एकेक ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर हाेऊ लागले आहेत. काही ठिकाणी भाजपा (bjp) तर काही ठिकाणी एनसीपी तसेच काॅंग्रेसचे प्राबल्य दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटास रायगडमध्ये धक्का बसला आहे. (Maharashtra News)

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे (mva) गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे विजयी झाले आहेत. (MLA Bharat Gogavale Latest Marathi News)

Grampanchayat Election Result 2022, Raigad
Grampanchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निकालात भाजपची सरशी; राष्ट्रवादीनं खातं खाेललं

महामुणकर यांचा विजय हा आमदार भरत गाेगावले आणि त्यांच्या गटास धक्का मानला जात आहे. महामुणकर यांना विजयी घाेषित करताच त्यांच्या समर्थकांनी ढाेल ताशांच्या गजरात जल्लाेष केला. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Grampanchayat Election Result 2022, Raigad
Crime News : निलंग्यात डॉक्टरला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com