Ambernath Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath News : प्रेम विवाहाचा भयानक शेवट, पतीने पत्नीला एका क्षणात संपवलं; चिमुकलीचं मायेचं छत्र हरपलं

Ambernath Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली.

Satish Daud

अजय दुधाने, साम टीव्ही

अंबरनाथ : पती-पत्नीमध्ये वाद होणं ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना दोघांमध्ये नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, पण काहीवेळा ते विकोपालाही जातात. त्यानंतर गुन्हेगारीच्या मोठमोठ्या घटना घडतात. अशीच एक घटना अंबरनामध्ये घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या केली. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ही घटना घडली.

हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. विकी लोंढे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. आरोपी विकीचा ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

त्याला एक वर्षाची मुलगी देखील आहे. आरोपी विकीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वादाचे खटके उडत होते. याच वादातून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केली आणि घरातून पसार झाला.

याबाबत रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्रथमदर्शनी चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला आहे.

तर आरोपी विकी लोंढे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या घटनेमुळे या दाम्पत्याच्या एक वर्षाच्या चिमुकलीचं मायेचं छत्र मात्र हरपलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT