Ambernath Municipal Council
(अंबरनाथ नगरपरिषद)
Ambernath Municipal Council (अंबरनाथ नगरपरिषद) Saam TV
मुंबई/पुणे

Ambernath: अंबरनाथ पालिकेकडून मालमत्ता कराची ७० टक्के वसूली! आर्थिक वर्षाअखेर ९० टक्के वसूलीचं उद्दिष्ट...

Ambernath Municipal Council News: ४२ कोटींपैकी २९ कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा; ३१ मार्चनंतर थकबाकीदारांच्या मालमत्तांवर होणार जप्तीची कारवाई...

अजय दुधाणे

अंबरनाथ: अंबरनाथ पालिकेनं (Ambernath Municipal Council) यंदाच्या वर्षी मालमत्ता कराची ७० टक्के वसूली केली आहे. ३१ मार्चपर्यंत, म्हणजेच आर्थिक वर्षाअखेर ९० टक्के कर वसूली (Tax Recovery) करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट असणार आहे. अंबरनाथ (Ambernath) शहरात दरवर्षी एकूण ४२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा होणं अपेक्षित असतं. यामध्ये रहिवासी आणि औद्योगिक अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २९ कोटी रुपयांची, म्हणजेच ७० टक्के कर वसूली करण्यात आली आहे. (Ambernath Municipality collects 70 percent of property tax! Aim for 90 percent recovery by the end of the financial year)

हे देखील पहा -

३१ मार्चपर्यंत नागरिकांना कर भरता येणार असून तोपर्यंत ९० टक्के कर वसूलीचं उद्दिष्ट नगरपालिकेने ठेवलंय. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी पालिकेनं अनेक नव्या मालमत्तांना कर लावला असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त २ कोटी रुपयांची भर पडणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेनं केलेल्या या ७० टक्के वसुलीपैकी जवळपास ३० टक्के वसूली ही गेल्या महिन्याभरात झालीये. त्यापूर्वी शासनाकडून आलेले ३ अधिकारी फारशी वसूली करू शकले नव्हते, अशीही बाब समोर आलीये.

दरम्यान, ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर (Property Tax) न भरल्यास मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही नगरपालिकेने दिलाय. त्यामुळं नागरिकांनी कारवाई आणि दंड टाळण्यासाठी लवकरात लवकर मालमत्ता कर भरण्याचं आवाहन नगरपालिका प्रशासनाने केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धक्कादायक, अमरावतीच्या मेळघाटात अजूनही 2206 बालके कुपोषित

Crying Fact: रडताना शरीरात कोणते बदल होतात? डोळ्यातून पाणी का येतं?

Indian Railway : धावत्या ट्रेनमध्ये लोको पायलटला टॉयलेट वापरण्याची गरज पडल्यास कुठे जातो? जाणून घ्या सविस्तर

खरंच? जुन्या डिव्हाइसपासून सोनं काढणे शक्य आहे का? जाणून घ्या

स्मशानभूमीत कारमध्ये भाजप नेत्याची रासलीला; विवाहित महिलेसोबत संबंध ठेवताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं | Shocking