Ambernath MIDC 
मुंबई/पुणे

Ambernath MIDC तील रासायनिक कंपनीतून गॅस गळती; शहरात पसरला केमिकलचा धूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथ शहरातील मोरिवली एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीतून गॅस गळती होऊ लागली आहे. संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरला असून या गॅसचा नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. नागरिकांना डोळे चुरचुरणे, आणि घश्यात खरखर होण्याचा त्रास नागरिकांना जाणवत आहे. गॅस गळतीच घटना घडल्यापासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन नॉट रीचेबल असल्याची माहिती समोर आलीय.

गॅस गळतीमुळे वातावरणातील दृश्यमानता कमी झालीय. अख्या शहरात गॅस गळती झाल्याने रेल्वे रुळावरील दृश्यमानता कमी झालीय. त्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजपूत यांचा फोन नॉट रीचेबल येत आहे. यामुळे या धुरांचं काय करावं हे कळत नाही. संपूर्ण शहरात धूर पसरला असताना अधिकाऱ्यांचा फोन लागत नसल्याने भयाण परिस्थिती निर्माण झालीय. या स्थितीची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्धभवत आहेत. अनेकांना उलट्या होत आहेत, तर काहींना घसा खवखवण्याचा त्रास जाणवत आहे. दरम्यान ही वायू गळती का झाली याची कारण अद्याप समजू शकलं नाहीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News : जमिनीच्या वादातून फवारले पिकावर तणनाशक; भावविरुद्ध पोलीसात तक्रार

Maharashtra News Live Updates: कॉग्रेस नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

CIDCO Lottery 2024: सिडकोचा दसऱ्याला धमाका, सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार, तब्बल ४० हजार घरांची लॉटरी निघणार?

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल बनला नंबर 2! नंबर 1 बनण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

Baramati News : बारामती हादरले.. दोन अल्पवयीन मुलींवर चौघांकडून अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT