Mhada Home Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Home: अंबरनाथमध्ये २० लाखांत घर; २५३१ घरांसाठी लॉटरी

Ambernath Mhada Lottery: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. अंबरनाथमध्ये फक्त २० लाखांत तुम्हाला घरं मिळणार आहे. मध्यम व अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही घरे बांधण्यात येणार आहेत.

Siddhi Hande

मुंबईत घर घेणे हे मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे कधी कधी पूर्ण आयुष्य लोनचे हप्ते फेडण्यात जाते. जर तुम्हालाही स्वतः चे घर घ्यायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. अंबरनाथमध्ये तुम्हाला २० लाखांत घर मिळणार आहे.

अंबरनाथमध्ये २० लाखांत घर (MHADA Housing Project In Ambernath)

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) हा नवीन उपक्रम असणार आहे. शिवगंगा नगर आणि कोहोज कुंठवली येथे घरे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मुंबईजवळ घर स्वतः चे हक्काचे घर घेता येणार आहे.

कोणाला मिळणार घरे?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारणाने मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे बांधायचे ठरवले आहे. मध्यम कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किंमतीत घर मिळावे, यासाठी हा नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण २५३१ घरे बांधण्यात येणार आहेत.

या ठिकाणी मिळणार घरे (Project)

शिवगंगा नगर येथे एकूण ९२५ फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. यातील १५१ फ्लॅट हे अत्यल्प गटासाठी असणार आहे. तर ७७४ फ्लॅट हे मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. कोहोज कुंठवली येथे १६०६ घरे बांधण्यात येणार आहे. ही सर्व घरे अत्यल्प गटासाठी असणार आहेत.

घराच्या किंमती किती? (House Price)

अत्यल्प उत्पन्न गटासाठी घराच्या किंमती २० ते २२ लाख रुपये असणार आहे. मध्यम उत्पन्न असलेल्या घरांच्या किंमती ४५ ते ५० लाख रुपये असणार आहे.यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील उपलब्ध असलेल्या घरांचे क्षेत्रफळ ३२० चौरस फूट आहे. या घरांची किंमत २० ते २२ लाख असणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध असलेल्या घरांचे क्षेत्रफळ ६५० ते ७२५ चौरस फूट असणार आहे. या घरांची किंमत ४५ ते ५० लाख रुपये असणार आहे.

कधीपर्यंत होणार काम पूर्ण?

या दोन्ही प्रकल्पांचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. मार्च २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT