Speeding car rams into three bikers on Ambernath flyover; horrific accident captured on CCTV. saam tv
मुंबई/पुणे

Ambernath Accident: भरधाव कारनं दुचाकी उडवल्या; चौघांचा मृत्यू, दुचाकीस्वार हवेत उडून पुलाखाली पडला; थरारक व्हिडिओ

Ambernath Accident Video: अंबरनाथ उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकीस्वारांना चिरडलं. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झालेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Bharat Jadhav

  • अंबरनाथ उड्डाणपुलावर भरधाव कारनं ३ दुचाकीस्वारांना चिरडलं.

  • दुर्घटनेचा संपूर्ण थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय.

  • दोन गंभीर जखमींना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथमधील पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर एक भीषण अपघात झालाय. एका कार चालकानं तीन दुचाकीस्वारांना चिरडलंय. या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झालेत. दोन जखमींना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलंय. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

अंबरनाथमध्ये पूर्व–पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर आज सकाळी भीषण अपघात झाला. वेगावर नियंत्रण सुटल्याने कार चालकाने तीन मोटरसायकलस्वारांना जबर धडक दिली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसलीय. अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत.

यातील एक जखमींवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक महिला गंभीर जखमी असून तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक ताबा सुटल्याने कार उलटसुलट गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: नव्या कर्मचाऱ्यांना मिळणार ₹15,000! हप्ता मिळवण्यासाठी लगेच करा हे काम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT