Ambernath Goat Price Rs 1.25 Crore Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath Goat Price Rs 1.25 Crore: अंबरनाथमध्ये तब्बल सव्वा कोटींचा बोकड! अंगावर लिहिलंय 'अल्लाह' आणि 'मोहम्मद'

Ambernath Goat Price: अंबरनाथमध्ये एक बोकडाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

अजय दुधाणे

Ambernath News Today: अंबरनाथमध्ये एक बोकडाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याचे कारण देखील तसेच आहे. या बोकडाच्या अंगावर नैसर्गिकरित्या 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द लिहिलेले आलं आहे. त्यामुळेच या बोकडाच्या मालकानं त्याची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी किंमत ठेवली आहे. या बोकडाचा मालक या पैशातून गावी मदरसा बांधणार आहे. (Latest Marathi News)

तहसील कार्यालयामागील सिद्धार्थ नगरमध्ये शकील शेख हा कुटुंबीयासह राहतो. शकील याला बोकड आणि बकरी पाळण्याची आवड आहे. त्याच्या घरीला एका बकरीला दीड वर्षांपूर्वी एक पिल्लू झालं, त्याचं नाव शेरू असे ठवण्यात आले. शकीलने या शेरूचा मोठ्या प्रेमाने संभाळ केला. (Ambernath News)

'अल्लाह' आणि 'मोहम्मद' असे शब्द या बोकडाच्या मानेवर नैसर्गिकरित्या लिहिलेले आहेत. या बोकडाला फक्त दोन दात आहे तर त्याचं वजन तब्बल 100 किलो इतकं आहे. शकीलने या बोकडाची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी ठेवली आहे.

हा बोकड रोज सकाळ संध्याकाळ द्राक्षे, बाजरी, सफरचंद, हरभरा, मका असे पदार्थ खातो. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून मदरसा बांधण्याचं शकीलचं स्वप्न आहे. आता त्याच्या सव्वा कोटींच्या 'शेरू'ला कुणी विकत घेतं का? आणि शकीलचं मदरसा बांधण्याचं स्वप्न पूर्ण होतं का? हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे अंतरवाली सराटी येथे दाखल

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०' मध्ये मराठमोळ्या चेहऱ्याचा धमाका! सलमान खानच्या शोमध्ये 'या' कलाकाराची थेट एन्ट्री; पाहा १६ स्पर्धकांची संपूर्ण यादी!

Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोने इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k, 22k, 18k चे ताजे दर

Kidney health: किडनीच्या आजाराने त्रस्त आहात? मग या 5 पदार्थांपासून राहा चार हात लांब

Salary Hike : कंपनी तुमचा पगार का वाढवत नाही? या 5 चुका तुम्ही तर करत नाही ना?

SCROLL FOR NEXT