
Groom Lost his Life on Wedding Day: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी आपल्या नावरलीला आणण्यासाठी जाणाऱ्या नवरदेवाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला आहे. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नवरदेवाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबामध्ये शोककळा पसरली. (Latest Marathi News)
या घटनेमुळे लग्नघरात दु:खाचे वातावरण पसरले आणि लग्नाला आलेले लोक नवरदेवाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जरवल रोडच्या अटवा गावातील आहे. याठिकाणी राजकमल याचे वऱ्हाड अटैसा गावात जाणार होते. घरी लग्नाची (Marriage) पूर्ण तयारी झाली होती. नवरदेव राजकमलचे वऱ्हाड निघण्याच्या तयारीत होते. राजकमल देखील तयार झाला, बाशिंग बांधले आणि तितक्याच त्याची प्रकृती अचानक बिघडली. (Uttar Pradesh News)
त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात (Hospital) नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी (Doctor) दिलेल्या माहितीनुसार, राजकमल याचा मृत्यू हृदयविकाराच्याने झाला. ही दु:खद वार्ता ऐकून कुटुंबाने टाहो फोडला. घटनेची माहिती मिळताच नवरी पक्षाचे लोकही राजकमलच्या घरी पोहोचले. काही तासांपूर्वी ज्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. सगळेच आनंदात होते त्या आनंदावर राजकमलच्या मृत्यूने विरजण पडले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.