Buldhana News: लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू; आनंदाचा क्षण दुःखात बदलला

Buldhana Marraige News: सजनपुरी परिसरात तणावाचं वातावरण
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv

Buldhana News Today: बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात काल (30 मे) रात्री नऊच्या सुमारास एका लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो घुसल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी आहे. जखमी झाल्या व्यक्तीवर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहे. (Latest Marathi News)

Buldhana News
Ramdas Athwale : रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय भाजपला पर्याय नाही : रामदास आठवले

सजनपुरी परिसरात या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिणामी परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. (Buldhana News)

ऑटो रिक्षावाला विशिष्ट समाजाचा असल्याने आणि जखमी इसमचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी (Police) या परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात केला. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Buldhana News
Buldhana Crime News: खामगाव तालुक्यातील बोरी आडगावात सिनेस्टाईल दरोडा; एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

नेमकं काय घडलं?

सजनपुरी परिसरात काल (30 मे) रात्रीच्या सुमारास लग्न सोहळा पार पडत होता. त्याचवेळी लग्न समारंभाच्या मंडपात अचानक भरधाव ऑटोरिक्षा घुसली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ऑटोरिक्षाच्या धडकेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील १ पुरुष गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यानंतर त्याला अकोला (Akola) येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात (Hospital) नेत असताना वाटेतच या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे सजनपुरी परिसरात रात्री तणाव निर्माण झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com