ambernath crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath Crime : दुहेरी हत्येने अंबरनाथ हादरलं, रात्रीच्या सुमारास दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या

अजय दुधाणे

Ambernath Crime News:

अंबरनाथमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमधील दुर्गापाडा परिसरात ही घटना घडली. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी दुहेरी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. सूरज परमार आणि सूरज कोरी या दोन तरुणांची हत्या झाली. या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हत्येने दुर्गापाडा परिसरात खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुहेरी हत्या झाल्याचे कळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्यास पोहोचले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या बिझी छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच उल्हासनगर क्राईम ब्रँच करीत आहे.

दोघांची हत्या कोणी केली?

या दोन तरुणांची हत्या का झाली? कशी झाली? का करण्यात आली? याबाबत विविध अंदाज पोलिसांकडून लावले जात आहेत. दरम्यान, मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती भुरटे असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT