Ambernath Police Station  Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News: अंबरनाथ हादरले! ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, एका मुलीसह ६ अटकेत

Ambernath Police Station: १२ जुलै रोजी अंबीवलीमध्ये राहणारी ११ वर्षांची मुलगी आपल्या आजीसोबत अंबरनाथमध्ये आली होती. या मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Priya More

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिमच्या खडी मशीन परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ३ अल्पवयीन मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे अंबरनाथ हादरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी अंबीवलीमध्ये राहणारी ११ वर्षांची मुलगी आपल्या आजीसोबत अंबरनाथमध्ये आली होती. यावेळी रस्त्यावरून जात असताना मुलगी आजीचा हात सोडून निघून गेली. दिवसभर ती अंबरनाथमध्ये इकडे तिकडे फिरली. त्यानंतर या मुलीला १३ वर्षांची मुलगी भेटली. ही मुलगी पीडित मुलीला अंबरनाथच्या खडी मशीन परिसरात घेऊन गेली. याठिकाणी एका मुलाने या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला.

पीडित मुलीच्या वडिलांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध घेतला असता ती अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळून आली. या मुलीची विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर इतर दोघे तरुण आहेत. 'याप्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलीवर एकाच मुलाने बलात्कार केला आहे. त्यावेळी घटनास्थळी इतर जण उपस्थित होते त्यामुळे त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.', अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. शहाराध्यक्ष सदा मामा पाटील यांनी अंबरनाथ पोलिसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणातील आरोपींविरोधात कारवाई व्हावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली. ही घटना १२ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी १३ जुलै रोजी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले असून त्याआधारे ते तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT