अंबरनाथ नगरपालिकेची इमारत बनलीय धोकादायक
अंबरनाथ नगरपालिकेची इमारत बनलीय धोकादायक अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंबरनाथ नगरपालिकेची इमारत बनलीय धोकादायक!

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेची प्रशासकीय इमारत सध्या धोकादायक बनली आहे. या इमारची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्यामुळे पालिकेचे कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत घेऊन काम करत आहेत.नव्या इमारतीचं काम मुदत उलटून गेली तरी अजून पुर्ण झालेल नाही त्यामुळे जुन्या इमारतीमध्येच पालिकेतील कर्मचाऱ्यांना रोज काम कराव लागत आहे. Ambarnath municipality building becomes dangerous

हे देखील पहा-

आता ज्या इमारतीचीbuilding पडझड झाली आहे त्या नगरपालिकेचे बांधकामConstruction १९७६ साली पूर्ण करण्यात आलं होतं. २३ ऑक्टोबर १९७६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणChief Minister Shankarrao Chavan यांच्या हस्ते या इमारतीचं उदघाटन करण्यात आलं होतं. आता ही इमारत ४५ वर्षांची झाली असून वयोपरत्वे ती धोकादायक झालीये. पालिकेच्या अनेक विभागात प्लॅस्टर कोसळलं असून काही विभाग तर वाळवीनं अक्षरशः व्यापून टाकलेत. याच इमारतीच्या बाजूला असलेली अग्निशमनFirefighting दलाची इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये अतिधोकाढायक आढळल्याने ती तातडीनं पाडण्यात आली. त्यामुळं आता अंबरनाथ पालिकेच्या इमारतीचंही स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

अंबरनाथ पालिकेची सध्याची इमारत जुनी झाल्यानं २०१७ साली याच इमारतीच्या मागे नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात १८ महिन्यात हे काम पूर्ण होणं अपेक्षित असताना आता ४८ महिने उलटून गेले, तरी इमारतीतली कामं पूर्ण झालेलीच नाहीत. या सगळ्याबाबत अंबरनाथAmabarnath नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना विचारलं असता, पालिकेच्या सध्याच्या इमारतीची अवस्था जीर्ण झाल्याचं त्यांनी मान्य करत नव्या इमारतीचं काम पूर्ण व्हायला अजून काही महिने लागतील, असं त्यांनी सांगितलं आहे मात्र आता एखाद्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात प्लॅस्टर पडल्यानंतर नवीन इमारतीच्या कामाला वेग येणार का? असा प्रश्न कर्मचारी वर्गामधून उपस्थित होतोय.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Man Killed girlfriend : प्रेमाचा भयंकर शेवट! मनालीला फिरायला नेलं, गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये कोंबला

Today's Marathi News Live :झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कोर्टाचा दिलासा नाहीच

Kalyan Crime : भंगार चोरल्याने बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू; कल्याण बसस्थानक परिसरातील घटना

तुळजापूर: देवीच्या सोने-चांदी अपहार प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा अवमान याचिका दाखल करणार : हिंदु जनजागृती समिती

Pimpri Chinchwad Hoarding Collapsed: पिंपरी-चिंचवड होर्डिंग कोसळ्याप्रकरणी कारवाई, मालक आणि स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्यांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT