Javed Akhtar Saam Tv
मुंबई/पुणे

Javed Akhtar News: मी नास्तिक असलो तरी राम आणि सीता यांना मानतो: जावेद अख्तर

Javed Akhtar In MNS Dipotsav: जावेद अख्तर यांनी जय सियारामच्या दिल्या घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Javed Akhtar In MNS Dipotsav:

'राम आणि सीता यांना मी खूप मानतो. माझ्या सारखे जे नास्तिक आहेत, ते सुद्धा त्यांना मानतात', असं प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर म्हणाले आहेत. आज दादर येथे मनसेच्या वतीने दीपोत्सव कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं होतं. यात शिवाजी पार्कात मोठी रोशनी करण्यात आली होती. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, लेखक सलीम खान, अभिनेता रितेश देशमुख आणि आशुतोष गोवारीकर उपस्थित होते. याच कार्यक्रमात बोलताना त असं म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी जय सियारामच्या घोषणाही दिल्या.

ते म्हणाले की, ''काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या पाहिजेत. काही लोक आश्चर्यचकित झाले असतील की, राज ठाकरे यांना बोलवायला अजून कोणी दुसरा सापडला नाही का? याची दोन कारणे आहेत. एकतर आमची चांगली मैत्री आहे आणि दुसरी गोष्ट ही की, मी राम आणि सीता यांना मानतो.''

यावेळी रितेश देशमुख याने सलीम खान आणि जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली. यातच बोलताना जावेद अख्तर म्हणाले, ''जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम यांची गोष्ट करतो, तेव्हा ते राम आणि सीता हेच आहेत. रामायणामध्ये राम आणि त्यांचे भावंड हे नातं सुद्धा अद्भुत आहे. रामाला जो वेगळं करेल तो रावण आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जावेद अख्तर म्हणाले की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी कमी झालं आहे.'' ते म्हणाले, ''शोले जर आज आम्ही लिहिला असता तर त्यातील तो सीन ज्यामध्ये ती (Hema Malini) मंदिरात जाते आणि मागे धर्मेंद्र उभे असतात. तो सीन मी आज लिहिला नसता आणि सलीम खान यांनीही लिहिला नसता. आज यावर मोठा वाद झाला असता.''

जावेद अख्तर म्हणाले, ''तुम्ही कोणालाही मानत नसाल तरीही तुम्ही हिंदू आहात, हीच हिंदू संस्कृती आहे. यानेच आपल्याला लोकशाहीचा दृष्टिकोन दिला आहे. उलट मीच योग्य आहे आणि सर्वजण चुकीचे आहेत, असा विचार करणं हे चुकीचं आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT