ना सोशल डिस्टसिंग, ना मास्क; कोविड नियमांचा काँग्रेसभवनात फज्जा! अमोल कविटकर
मुंबई/पुणे

ना सोशल डिस्टसिंग, ना मास्क; कोविड नियमांचा काँग्रेसभवनात फज्जा!

आपल्याकडे एक वाक्यप्रचार आहे 'हम करे सो कायदा' याचाच प्रत्यय आपल्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांना कोरोना काळातील लॉकडाऊन पासून येत आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : आपल्याकडे एक म्हण आहे 'हम करे सो कायदा' याचाच प्रत्यय आपल्यासारख्या अनेक सामान्य नागरिकांना कोरोना काळातील लॉकडाऊनLockdown पासून येत आहे. हो कारण 'दो गज की दुरी मास्क है जरुरी' म्हणत खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीचNarendra Modi सुरु केलेली पश्चिम बंगालमधली प्रचारसभा असो वा मग पंढरपुरमधील निवडणूकीसाठी राज्य सरकारणे फक्त सोलापूर जिल्हा वगळून केलेली अयोग्य नियमावली, किंवा शिवसेनेचा आत्ताच झालेला युवा मेळावा असो हे कमी की काय म्हणून जनतेचे आशिर्वाद 'कामाआधी' घेण्यासाठी भाजपाने काढलेली 'जनाशीर्वाद यात्रा'janashirvad Yatra इथपर्यंतचा हा प्रवास त्यातच आज भर पडली ती 'कॉँग्रेसजणांची' अर्थातच आपण सरकारमध्ये आहेत त्यामुळे आम्ही का मागे म्हणत आज त्यांनीसुध्दा आपल्या सरकारच्या घोषणांना न साजणार पण कृतीला शोभेसं वर्तन केलं ते म्हणजे कोरोना नियमांचा फज्जा उडवणं.All the covid rules were broken in the Congress building

हे देखील पहा-

पुणे महानगरपालिकेच्याPune PMC निवडणुकीच्या Elections पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेNana Patole यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका आयोजित केल्या होत्या अर्थातच बैठका म्हणलं की निष्ठावंत कार्यकर्ते निष्ठा दाखविण्यासाठई गर्दी करणार आणि अशा गर्दी मुळेच बैठक संपताच कोविडच्या नियमांचा फज्जा उडाला गेला. कारण पाय ठेवायलाही जागा नव्हती, इतकी गर्दी कार्यकर्त्यांनी पटोले यांच्याभोवती केली. काहींनी अर्थवट मास्क लावले होते, तर काहींनी मास्क लावण्याचीही तसदी घेतली नाही. त्यामुळे मंत्रीसाहेब आणि पक्षातील लोकांना सुट बाकी नियम कायदा आणि निर्बंध सब झूट अशीच म्हणायची वेळ सध्या सर्वसामान्य नागरिकांवरती आली आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT