Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

२ मार्चपासून पुण्यातील सर्व प्राथमिक शाळा सुरू होणार - अजित पवार

१ मार्चपासून जम्बो हॉस्पिटल बंद होणार, पवारांची महापौरांसोबत चर्चा

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - पुणे शहरात कोरोना (Corona) रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. पुणे (Pune) जिल्ह्यात ५१ टक्के कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पुण्याचा कोरोना दर ४.४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे आता सर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू होणार आहेत. सर्व नियमाचे पालन करून शाळा (School) सुरू करण्यात येणार आहे. पालकांना वाटलं तर त्यांनी मुलं शाळेत पाठवावी असे अजित पवार (Ajit Pawar) विभागीय आयुक्त कार्यलयात कोरोना आढावा बैठकीत बोलत होते.

हे देखील पहा -

पुढे अजित पवार म्हणाले की, लसीकरण जास्तीत जास्त करणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी बोलून रुग्ण संख्या पाहता आता गरज वाटत नाही म्हणून १ मार्चपासून जम्बो हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबद पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्च झाली आहे. सध्या कोरोना आकडेवारी घट होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे देखील ते यावेळी म्हणाले.

पुढे अजित पवार यांनी युक्रेनवरील परीस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, १२०० ते दोन हजार लोक युक्रेनमध्ये असल्याचे माहिती समोर आली आहे. तर ३६६ पालकांशी संपर्क सुरू असून त्यांच्याशी नियंत्रण कक्षामार्फत बोलणं सुरू आहे. त्यांना मोबाईल नंबर ई मेल दिलेले आहेत. काही जण आज मुंबईत पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री आणि मी लक्ष देऊन आहोत. युद्धजन्य परिस्थिती असल्याने आपले नागरिक आणायचा प्रयत्न सुरू आहे असे देखील पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT