दारू माफियांचे तळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उध्वस्त ! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

दारू माफियांचे तळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उध्वस्त !

प्रदीप भणगे

कल्याण :  गटारी अमावस्या जवळ येत असल्याने गावठी दारूला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चालली आहे. यासाठी मलंगगड येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती केली जात आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दारू निर्मिती आधीच चार लाखांचे नवसागर मिश्रित रसायन नष्ट केलं आहे.

हे देखील पहा -

गावठी दारूची वाढती मागणी लक्षात घेता सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारूची निर्मिती केली जात आहे. मात्र या दारूला बाजारात विक्रीसाठी परवानगी नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलंगगड भागात दारू निर्मितीसाठी तयार केले जात असलेले रसायन नष्ट करण्याचा धडाका राज्य उत्पादन शुल्क विभागाने लावला आहे.

मलंगगड भागातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंभार्ली येथे आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माणेरे गावच्या शिवारात १६,८०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबरनाथ विभागीय पथकाने तीन गुन्हे दाखल करत धडक कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक आर.बी.राठोड यांसह पी. एन. यशवंतराव,पी.टी. पडवळ,व्ही.एन.सानप यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. ग्रामीण भागात निर्माण होत असलेली गावठी दारू शहरी भागात विक्रीसाठी जायच्या आधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. दारू विक्रीवर कारवाई करण्याआधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट दारू निर्मितीच्या मुळाशी जाऊन तळच उध्वस्त केले आहेत. त्यामुळे आता दारू माफियांचे धाबे ग्रामीण भागात चांगलेच दणाणले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुर तालुक्यातील घोडेगंगा साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune Truck Collapsed : २५ फूट खड्ड्यात कोसळला PMC चा ट्रक; मैलापाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीकरताना दुर्घटना

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT