बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी त्याचे आई वडील आणि काका आता दफनभूमीच्या शोधात असल्यावही माहिती समोर आली आहे.
कल्याण कोर्टाने अक्षय शिंदे यांच्या आई आणि वडिलांना दफनभूमीची जागा दाखवा, अशा सूचना दिल्या आहेत. यानंतर आज पोलिसांनी त्यांना अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमी येथे नेलं. जिथे अक्षयच्या आई आणि वडिलांनी एक दफनभूमी निवडली आहे. मात्र यालाच मनसेने विरोध दर्शवला आहे.
अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथमध्ये होऊ देणार नाही, असा इशाराच मनसेनं दिलाय. मनसेनं अंबरनाथ पालिकेला पत्र देऊन विरोध दर्शवलाय. अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराचा इतिहास आहे. अक्षय शिंदे हा कुणी साधू महात्मा नव्हे, असं मनसेनं म्हटलंय. तसेच त्याचा दफनविधी येथे होऊ देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी चौकशी करीत असणारी सीआयडीची एक टीम आज ठाण्यातील कळवा रुग्णालय या ठिकाणी पोहचली आहे. अक्षय शिंदे याचा मृतदेह आज अंबरनाथ या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी पथकाने येथे पोहोचत चौकशी केली.
दरम्यान, अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र लिहिलं आहे. त्यांनी स्वतःचे कुटुंब, वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी या पत्रातून केली आहे. तसेच किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे, त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्यापेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफियाडून आहे, असं ते म्हणाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.