Akshay Shinde Encounter Case Saam Tv
मुंबई/पुणे

Akshay Shinde Encounter Case : शिंदेचा एन्काऊंटर बोगस? शिंदेचा एन्काऊंटरला पोलीसच जबाबदार, पाहा स्पेशल रिपोर्ट

Akshay Shinde Case : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांना मुंबई हायकोर्टानं मोठा झटका दिलाय. चौकशी समितीच्या अहवालात नेमक्या काय धक्कादायक समोर आलंय? आणि कोर्टानं पोलिसांवर काय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Akshay Shinde Encounter Case : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांनी केलेला एन्काऊंटर बोगस असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सामोरं आलं आहे. हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र या अहवालात नेमकं काय आहे? पाहूयात.

चौकशी अहवालात काय?

- अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला 5 पोलीस जबाबदार

- 5 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवा

- स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद

- बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत

- अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद

- अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाही

या अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतलीय. कोर्टानं थेट पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं काय ताशेरे ओढले आहेत ते पाहूयात.

कोर्टाकडून अहवालाची गंभीर दखल

- पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा.

- पोलीस कर्मचारी संजय शिंदे, निलेश मोरे, अभिजीत मोरे, हरीश तावडेंसह चालकावर गुन्हे दाखल करा.

- पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार?

- दोन आठवडयात भूमिका स्पष्ट करा.

असे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.

या प्रकरणामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केल्याची शंका माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केलीय. तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले आहेत.

आता अक्षयचा एन्काऊंटर कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आला? की रॉबिनहूड प्रतिमा बनवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून एन्काऊंटर केला? की कुणाला तरी राजकीय फायदा व्हावा यासाठी हा एन्काऊंटर घडवून आणला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT