बदलापूरमधील दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला ही केस लढवायची नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोरदार चर्चा होत आहेत. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आम्हाला ही केस लढवायची नसल्याचे कोर्टाला सांगितले. 'आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्हाला ही धावपळ आता जमत नाही.', असे त्यांनी कोर्टाला सांगितले. याप्रकरणावर आता उद्या सुनावणी होणार आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात विरोधकांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हा फेक एन्काऊंटर असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. तर अक्षयच्या आई-वडिलांनी आमचा मुलगा दोषी नसल्याचे सांगत आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. पण आता अचानक त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. त्यांनी ही केस लढवायचे नसल्याचे सांगितले. आता याप्रकरणाची सुनावणी उद्या होईल.
सुनावणीदरम्यान अक्षयच्या आईने ही केस का लढायची नाही यामागचे कारण कोर्टाला सांगितले. त्या म्हणाल्या की, आम्हाला लोकांकडून खूप टॉर्चर होत आहे. आम्हाला आता धावपळ सहन होत नाही. आमचा मुलगा गेला.' तर केस न लढण्यामागे कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न कोर्टाने त्यांना विचारला. तर त्यांनी सांगितले की, 'आमच्यावर कुणाचाही दबाव नाही' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटवर प्रकरणामध्ये ५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.