AJit Pawar saam TV
मुंबई/पुणे

Baramati Maratha Andolan : सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सत्तेतून बाहेर पडा; बारामतीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी VIDEO

Political News : जालना लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

प्रविण वाकचौरे

मंगेश कचरे

Baramati News :

जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असेलल्या बारामतीत देखील कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

बारामतीत मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलकांना यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीतून अजित पवार यांना सरकारमधून बाहेर पडा अशी मागणीही मराठा बांधवांनी केली. (Latest Marathi News)

'सरकारचा भरलाय घडा, अजितदादा सरकारमधून बाहेर पडा', अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. काल काटेवाडीत रास्तारोको केला होता तेव्हा देखील अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी करण्यात आली होती.

अजित पवार नाराज?

जालना लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजित पवारांचे सगळे कार्यक्रम राखीव ठेवण्यात आले आहेत. मागील २ दिवसांपासून अजित पवारांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाही. अजित पवारांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दिली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहावर १२ वाजता मराठा आरक्षणासंदर्भात  महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला देखील अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता अगदी कमीच आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम, पुण्यातील विविध कार्यक्रमांना गैरहजर राहिल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पंढरपुरात तातडीची बैठक

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Breaking News: मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT