Shruti Vilas Kadam
सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काही लोकांना पोटात जळजळ किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उठल्याबरोबर चहा पिणे टाळावे.
बिस्किटांमध्ये साखर आणि मैदा असतो. त्यामुळे रोज चहासोबत गोड बिस्किटे खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. डायबिटीज असलेल्या लोकांनी बिस्किटे कमी खावीत.
चहामध्ये साखर आणि बिस्किटांमध्ये मैदा व फॅट्स असतात. रोज जास्त प्रमाणात चहा आणि बिस्किटे खाल्ल्यास शरीरात जास्त कॅलरीज जातात. त्यामुळे वजन वाढू शकते.
सकाळी फक्त चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. पण शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे.
बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. रोज गोड बिस्किटे खाल्ल्याने दातांमध्ये कीड होऊ शकते. त्यामुळे बिस्किटे खाल्ल्यानंतर चूळ भरणे आणि दातांची स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे.
सकाळी फक्त चहा आणि बिस्किटे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहत नाही. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागू शकते. अशावेळी जास्त खाण्याची शक्यता असते.
चहामध्ये कॅफिन असते. जास्त चहा प्यायल्याने काही लोकांना रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे दिवसभरात चहा कमी प्रमाणात प्यावा आणि रात्री उशिरा चहा पिणे टाळावे.