सभागृहात कोणी चुकलं तर चार तास बाहेर ठेवा, 12 महिने ठेवू नका; अजित पवारांचा भाजपला टोला Saam Tv
मुंबई/पुणे

सभागृहात कुणी चुकलं तर चार तास बाहेर ठेवा, 12 महिने ठेवू नका; अजित पवारांचा भाजपला टोला

आपण जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, कुत्रा, मांजर, कोंबड्यांचं नाही- अजित पवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई - सभागृहात कुणी चुकलं तर चार तास बाहेर ठेवा पण 12 -12 महिने ठेवू नका अशी मिश्किल टीका अजित पवार यांनी भाजपवर केली आहे. तसेच आपण जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, कुत्रा, मांजर, कोंबड्यांचं नाही असे देखील ते यावेळी म्हणले. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे यावेळी ते बोलत होते.

पुढे अजित पवार म्हणाले की, आदर्श आचार संहितेचे पालन सर्वांनी केले पाहिजे. काही जणांना कसलाही अनुभव नसतो पण पक्षामुळे ते निवडून येतात असा नाव न घेता टोला देखील पवार यांनी लगावला आहे.

हे देखील पहा -

सदस्यांचे वर्तन कसे आहे. यावर सभागृहाची प्रतिमा ठरते. गेल्याकाही वर्षांमध्ये काही जणांच्या वर्तनाने सभागृहाच्या मानसन्मानाला धक्का बसला. आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सकाळी बैठक झाली तेव्हा सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित होते. पक्षीय जोडे बाजूला ठेवून चर्चा झाली. सर्वांनीच चिंता केली. आता विधिमंडळ आवारचे थेट प्रक्षेपण थेट होत असत म्हणून आपल्स वर्तन साजेसे ठेवले पाहिजे. लाखो मतदार हे तुमच्याकडे बघून मतदान करतात कुत्री, मांजर आणि कोंबड्या या प्राण्यांचे नेतृत्व करत नाही असे म्हणत अप्रत्यक्षपणे नाव न घेता अजित पवार यांनी नितेश राणेंचे कान टोचले.

तसेच भाजपवर टीका करत अजित पवार म्हणले की, कुणी चुकलं तर त्याला किमान चार तास बाहेर ठेवा, हवं तर एक दिवस ठेवा पण 12 -12 महिने ठेवू नका. या प्रस्तावावर अध्यक्ष महोदय विचार करायला हरकत नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

SCROLL FOR NEXT