NCP Leader Baburao Chandere Beaten Man Saam Tv
मुंबई/पुणे

NCP Leader: पक्षात हे प्रकार चालणार नाहीत; दादागिरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला अजितदादांचा टोला

NCP Leader Baburao Chandere Beaten Man: राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली. जमिनीच्या वादातून त्यांनी रौंदळ यांना मारहाण केलीय.

Bharat Jadhav

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केली. चांदेरे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अजित पवार यांनीही चांदेरे यांना ताकीद देत कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली. जमिनीच्या वादातून त्यांनी रौंदळ यांना मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. मारहाण करत चांदेरे यांनी रौंदळ यांचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. चांदेरे यांनी रौंदळ यांना धोबीपछाड डाव टाकत जमिनीवर आदळलं. यात विजय रौंदळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झालीय.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे यांच्याविरोधात पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचवेळी पक्ष अध्यक्ष अजित पवार यांनीही चांदेरे यांना ताकीद दिलीय. चांदेरे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी चांदेरे यांनी अशाच पद्धतीने रिक्षा चालकाला मारहाण केली होती.

चांदेरे यांनी रौंदळ यांना कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदारासमोर मारहाण केली होती. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याप्रकरणावरून अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. संबंधित व्यक्तीने तक्रार दिल्यास चांदेरे यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कुणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता त्यांचा फोन बंद आहे.

त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे की जो प्रकार झाला आहे ते मला आवडला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चांदेरे यांना बोलून जाब विचारला जाईल, जर तक्रार दिली तर कारवाई नक्की केली जाईल, असं अजित पवार म्हणालेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनवर अजित पवार यांनी भाष्य केलंय. तिथं आमचे तहसीलदार काल गेले होते त्यांचे निवेदन घेऊन तहसीलदारने सरकारकडे पाठवला आहे. काय मागणे आहेत काय निवेदन आहे हे पाहून जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT