Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवार दिल्लीत २४ तास वेटिंगवर, अमित शहांची भेट होणार का? VIDEO

Ajit Pawar Latest News : महायुतीच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार दिल्लीत ठाण मांडून आहेत. अजित पवार हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी प्रतीक्षेत आहेत.

Saam Tv

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महायुती सरकार स्थापनेचा तिढा वाढलेला असतानाच, मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे दिल्लीत आहेत. मागील २४ तासांपासून अजित पवार हे दिल्लीत ठाण मांडून असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत.

अजित पवार काल, सोमवारी रात्री ८ वाजता राजधानी दिल्लीत पोहोचले. मात्र, अद्यापही त्यांची अमित शहांसोबत भेट झालेली नाही. २४ तास उलटूनही पवार यांची शहांसोबत भेट झालेली नाही. आज, रात्री भेट होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

अजित पवार यांना मंत्रिमंडळासंदर्भात अमित शहा यांची भेट घ्यायची असल्याचे कळते. त्यामुळेच ते कालपासून दिल्लीत थांबले आहेत. शहा हे आज संध्याकाळी ६ वाजता चंदीगडवरून दिल्लीत पोहोचले असून, आज तरी शहा-अजित पवार भेट होणार का? भेट झालीच तर त्यांच्यात काय चर्चा होणार, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT