Ajit Pawar
Ajit Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar Upset : अजित पवार महायुतीत नाराज?, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

Prachee kulkarni

Pune News :

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेवरुन महायुतीत धुसपूस सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लाठीहल्ल्याच्या घटनेने नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांनी २ दिवसांचे नियोजित तीन कार्यक्रम कार्यक्रम रद्द केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पुणे, पिंपरी आणि बुलडाणा येथील कार्यक्रम रद्द करण्यात आले. याशिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमातही अजित पवार गैरहजर राहिले. सध्या सुरु असलेल्या चर्चांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Latest Marathi News)

अजित पवार आज मुख्यंमत्र्यांसोबत शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे काल आणि आज असे दोन दिवस कार्यक्रम होते. मात्र कोणत्याच कार्यक्रमांना जाणं अजित पवारांना जाणं टाळलं आहे.

त्यामुळे दोन दिवसांपासून अजित पवार कुठे आहेत? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवरील लाठीमार आणि फाईल क्लिअरन्सच्या मुद्द्यावर नाराज आहेत का, अशी चर्चा रंगली आहे. (Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

अजित पवार यांची तब्येत बरी नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर आहेत, त्यामुळे आता लोक नाराजीच्या चर्चा सुरु होतील. मात्र असं काही नाही आमच्यात फेविकॉलचा जोड आहे.आमचं सरकार मजबूत आहे. घट्ट आहे. या सरकारला कुठेही धोका नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

SCROLL FOR NEXT