Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: काही काही कार्यकर्ते चुकतात, पण आमची भावकीच चुकली, अजित पवारांनी निवडणुकीतला किस्साच सांगितला

Maharashtra Politics: शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अशोक पवार यांना खोचक टोला लगावला. निवडणुकीत त्यांना कसं पाडलं हेच त्यांनी सांगितले.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

'काही काही कार्यकर्ते चुकतात, पण आमची भावकीच चुकली.', असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव झाला होता. त्यांना निवडणुकीमध्ये कसं पाडलं याचे स्पष्टीकरणच अजित पवार यांनी दिले. शिरूरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी निवडणुकीतला हा किस्सा सांगितला.

शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे एका हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अशोक पवार यांना खोचक टोला लगावला. अजित पवार यांनी सांगितले की, 'कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. काही काही कार्यकर्ते चुका करतात आमची भावकी चुकली. नको नको म्हटलं तरी उभा राहिला. म्हटलं माऊलीकडून तुझा काटाच काढतो. त्याला स्वप्नही पडलं नसेल पाहून लाख मताने पडू. माऊलीने त्याला पाहून लाख मतांनी पाडला.'

तसंच, 'काही कार्यकर्ते कधी कधी चुका करतात, आमची भावकीच चुकली, अरे नको नको असे करू, चुकला तर म्हणालो माऊली कडून तुझा काटाच काढतो, त्यालाही स्वप्नातही वाटलं नसेल की पाऊन लाखांनी पडेल. तुम्ही सर्वांनी साथ दिली. तुमच्यामुळे आम्हाला हुरूप येतो.', असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT