Chhaava Movie : छावा चित्रपट पाहिल्यास हाॅटेल बिलात २५ टक्के सूट; पंढरपुरात हॉटेल चालकाचा उपक्रम

Pandahrpur News : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे काही ठिकाणी तिकीट मिळत नाही
Chhaava Movie
Chhaava MovieSaam tv
Published On

पंढरपूर : छत्रपती संभाजी महाराजारांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाने सध्या राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अशातच आता पंढरपुरातील श्रेयश हॉटेल मालकाने प्रेक्षकांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. हा चित्रपट पाहून येणाऱ्यांना हॉटेलच्या बिलात २५ टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.  

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे काही ठिकाणी तर तिकीट देखील मिळत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागील पाच- सहा दिवसांपासून हा चित्रपट हाऊसफुल्ल चालत आहे. यातच पंढरपूरमध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून हॉटेल चालकाने उपक्रम सुरु केला आहे. 

Chhaava Movie
Jalna Police : अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्री; चंदनझिरा पोलिसांची छापा टाकत दोन दुकानांवर कारवाई

जेवणाच्या बिलावर आकर्षक सूट 

छावा चित्रपट पहा आणि हॉटेलच्या जेवणाच्या बीलावर २५ टक्के सूट मिळवा अशी ऑफर सुरू केली आहे. श्रेयस हॉटेलचे मालक व मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी ही ऑफर आजपासून सुरु केली आहे. छावा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुरू केली आहे. छावा चित्रपटाचे तिकीट दाखवायचे आणि मनसोक्त जेवण करायचे. संपूर्ण जेवणाच्या बिलावर तब्बल पंचवीस टक्के सूट देण्याचा निर्णय धोत्रे यांनी जाहीर केला आहे. 

Chhaava Movie
Jalgaon News : चिंताग्रस्त.. जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांतील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढले, रासायनिक खतांच्या अतिवापराने धोका

आजपासून सवलत लागू 

दरम्यान पंढरपूरमध्ये हॉटेल मालकाने सुरु केलेल्या या अनोख्या उपक्रमाला आजपासून सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान आता छावा चित्रपटाची तिकीट दाखवा आणि बिलाच २५ टक्के सूट मिळवा या उपक्रमाला प्रेक्षक कसा आणि किती प्रतिसाद देतात हेच आता पहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com