जळगाव : बुलडाण्यात गेल्या महिन्यात टक्कल पडण्याचे प्रकार घडले होते. पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढल्याने टक्कल पडल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. आता अशीच स्थिती जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये समोर आले असून जिल्ह्यातील १७१ गावातील पाण्यात नायट्रेनचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात देखील चिंतेचे वातावरण आहे.
मागील महिनाभरापासून बुलढाणा जिल्ह्यात टक्कल पडण्याचा व्हायरसची अनेकांना लागण झाली आहे. नेमकी हि लागण कोणत्या कारणामुळे झाली याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातच पाण्यात नायट्रेनचे प्रमाण अधिक असल्यामुळे टक्कल पडण्याचा आजार जडल्याचा अहवाल समोर आला होता. यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये नायट्रेनचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.
२०५ जलस्रोत नमुन्यांची तपासणी
शासनाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्फत या वर्षामध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात जिल्ह्यामधील १७१ गावांमध्ये २०५ जलस्रोतांवरून पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी केली गेली. या तपासणी अहवालामध्ये सर्व पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण कमाल मर्यादपेक्षा जास्त आढळले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे जिल्हा परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत.
रासायनिक खतांचे प्रमाण वाढल्याचा परिणाम
जळगाव जिल्हा राज्यात सर्वाधिक रासायनिक खते वापरणारा जिल्हा आहे. वर्षाकाठी सुमारे ५.५० लाख मेट्रिक टन खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात केला जातो. त्यातही शेतकऱ्यांकडून सर्वांत जास्त वापर युरियाचा केला जात आहे. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पुरवठ्यासाठी युरिया खताचा शेतकरी वापर करतो. परंतु या युरिया खताचा अतिरेक आणि अशास्त्रीय पद्धतीने वापर होत असल्यामुळे जमिनीला आणि पर्यावरणाला घातक ठरू लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.