अजित पवारांनी आमदार शरद सोनवणे यांच्यावर परखड टीका केली.
वादग्रस्त विधानावर "काही लोक विकृत असतात" असा टोला.
विकासकामांना प्राधान्य देण्याचा अजित पवारांचा आग्रह.
Deputy CM Ajit Pawar News : आदिवासी मंत्री आणि प्रकल्प अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार शरद सोनवणे यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया दिलीय. काही लोक विकृत असतात, अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विधानांना उत्तर देण्याची गरज नाही, अशा कडक शब्दांत अजित पवारांनी शरद सोनवणे यांना चपराक लगावली. यामुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शरद सोनवणे काय म्हणाले, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. सकाळपासून मी विकासाच्या गोष्टी सांगतोय, त्या दिल्या सोडून. काही काही लोक विकृत असतात. मी प्रत्येकाला उत्तर दिलं तर दिवस पुरायचा नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
कोणाचेही काम करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना लोक येऊन भेटतात. सत्तेवर कोण आणि विरोधी पक्षात कोण? ही पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्ही अनेकदा सत्तेत आणि विरोधात देखील होतो, जर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एखादी बाब असेल तर ती मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन सांगावे लागते. त्यामुळे अनेक लोक कोणत्याही पक्षाचे असले तरीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्यात राज्यच हित डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढतात, असे अजित पवार म्हणाले.
काही लोकांचे वेगळे विचार असतात. संजय राऊत काय म्हणाले त्यावर विचार माझा वेळ घेऊ नका. आम्हाला विकास करायचा आहे. विकासासाठी महत्त्व द्यायला पाहिजे, ते दिले जात नाही. कोणावरही मला काहीही मत व्यक्त करायचं नाही. लोकशाहीने सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. नो कमेंट्स, असे अजित पवार म्हणाले.
हिंजवडीत झालेल्या पहिल्या पावसाने अनेकांना त्रास सहन करावा. ही सगळी बाब देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर हिंजवडीत काम करायला सुरुवात केली. प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी या परिसराची पाहणी करण्याचे ठरवण्यात आलं आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकास सुरू करण्यात येत आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन अडचणी सोडवण्यात येणार आहेत. कोणालाही नाराज करायचं नाही, रस्त्यांचे रुंदीकरण करणार आहे. हिंजवडी परिसरातलं कायमचा वाहतुकीचे दुखणे दूर करायचं आहे, असे अजित पवार म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.