Ajit Pawar Press Conference 
मुंबई/पुणे

Pune Porsche Car Accident: मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही; दमानियांच्या आरोपांवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

Ajit Pawar Press Conference : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपाला उत्तर दिलंय.

Bharat Jadhav

मुंबई: 'मी कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. नुसता आरोप करण्यात अर्थ नाही, पुरावे द्या,असं रोखठोक उत्तर अजित पवार यांनी अंजली दमानियांच्या आरोपांवर दिलेत.पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अजित पवारांनीच पुण्यातील सीपींना फोन केला होता,असा आरोप दमानिया यांनी केला होता.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. याप्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे वडील आणि आजोबांवरतीही कारवाई करण्यात आलीय. या दुर्घटनेत दोषी असलेल्यां लोकांवर कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात हिट अँड रन प्रकरण घडल्यानंतर आपण एक ट्विट केलं होतं, असं अंजली दमानिया म्हणाल्यात. आरोपीला वाचवण्यासाठी अजित पवारांनीच पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा सवाल दमानिया यांनी केला होता. अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरून पत्रकार परिषदेत अजित पवारांना प्रश्न करण्यात आला.त्यावेळी अजित पवारांनी दमानिया यांना रोखठोक उत्तर दिलंय.

लोक प्रतिनिधी म्हणून शहरात घटना घडल्यानंतर माहिती मिळाल्यानंतर तेथील प्रमुखांना सुचना द्यावा लागतात. जर पत्रकार म्हणून तुम्ही मला माहिती दिली तर मी तेथील प्रमुखांना फोन करून त्या प्रकरणी माहिती घेतो. जर घटना पुण्यात घडली असेल तर पुणे आयुक्तांशी संपर्क साधतो. जर घटना पिंपरी-चिंचवड येथील असेल तर तेथील आयुक्तांना फोन करुन सांगतो. लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून मी शिपाई, पीआयला फोन करत नाही.

गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे, पण अशा प्रकारच्या कोणत्याच घटनेत कोणाला वाचवण्यासाठी फोन करत नाही, अशी घटना घडली असेल तर कोणाला पाठीला घाला, असं कधीच मी सांगत नाही. पण उलट तेथे जर मी दोषी असेल तरी कारवाई करा असे शब्द माझे असतात, असं उत्तर अजित पवारांनी पत्रकाराच्या प्रश्नाला दिलं.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून कोणत्याच दबावाला बळी पडू नका, असं सांगितलं. एका श्रीमंत बापाच्या मुलगा या घटनेला कारणीभूत आहे, त्यामुळे या प्रकरणात कोणत्याच राजकीय दबावाला बळी पडू नका अशा सूचना मी पुणे पोलीस आयुक्तांना दिल्याचं अजित पवार म्हणालेत. या प्रकरणात पोलिसांना आर्थिक प्रलोभन दिलं जाऊ शकतं, त्यामुळे पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी,अशा सूचना आयुक्तांना दिल्यात, असं अजित पवार म्हणालेत.

या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दोषींवर कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही दिलीय. मी सुद्धा सांगितलंय की, याप्रकरणात कोणतीच हयगय करू नये, असं सांगितलं. जो कोणी या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.याप्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि त्यांचे वडील आणि आजोबांवरतीही कारवाई करण्यात आलीय.या दुर्घटनेत दोषी असलेल्यां लोकांवर कारवाई होणारच, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT