अजित पवारांनी पहाटेपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी पोलिस आयुक्तांना वाहनं थांबवल्याबद्दल फटकारले.
चार लेन रस्ता मोकळा करण्याचे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले.
वाहतूक समस्येच्या समाधानासाठी चाकणला महानगरपालिका करण्याचा इशारा दिला.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील पुणे -नाशिक आणि तळेगाव -शिक्रापुर या दोन महामार्गावरील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी अजित पवार मैदानात उतरलेत. सकाळी ६ वाजता सुरु झालेल्या दौऱ्यात NHI आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी संवाद साधत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी घेतला. पाहणी करत असताना चाकणच्या चौकात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली. त्यामुळं अजित पवारांनी पोलिस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावले. 'ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये?, सगळी वाहतूक सुरु करा.', अशा शब्दात अजित पवारांनी पोलिस आयुक्तांना झापले.
अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली. पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील या चौकात वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. पुणे नाशिक महामार्गावर मोशी, आळंदी फाटा, गवतेवस्ती, चाकण चौक आणि आंबेठाण चौकात अजित पवार पहाणी दौरा करत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरून अजित पवार चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत जिल्हा प्राशासन, NHI आधिकारी यांच्याकडून सर्व आढावा घेत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी हजर होते. या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी नकाशा पाहणी करून वाहतूक कोंडीला अडसर ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेत अजित पवारांचा पहाटेपासून पहाणी दौरा सुरू आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुककोंडीचा आढावा घेताना अजित पवारांनी आधिकाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो दाखवत अपघतांची भीती व्यक्त केली. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'चाकणला महानगर पालिका करायचं चाललंय. बारामतीची तुलना चाकणशी करू नका.' अजित पवारांनी यावेळी वाहतूक कोंडीमुळे संतर्त झालेल्या कार्यकर्त्याची समजूत काढली. उपाययोजना करण्यासाठी चाकणमध्ये महानगरपालिका आणण्याचे अजित पवार यांनी संकेत दिले.
दरम्यान, ही वाहतुककोंडी सोडवत असताना चार लेनचा मार्ग तात्काळ मोकळा करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या असल्या तरी हे दोन्ही मार्ग इलेव्हेटेड कॉरिडॉर केल्याने सध्या मंजुरी मिळत नसल्याची खंत NHI च्या आधिकाऱ्यांना व्यक्त केली. आयटी पार्क हिंजवडी पाठोपाठ चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी परिसरातील महाळुंगे एमआयडीसी परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरीक त्रस्त झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.