
दिवेघाटात पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी ब्लास्टींगचे काम सुरू आहे.
या कारणामुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दिवेघाटातून वाहतूक बंद राहणार आहे.
वाहनचालकांनी कात्रज बोपदेव, खेडशिवापूर, कापूरहोळ, शिंदवणे घाट मार्गांचा पर्यायी वापर करावा.
पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे.
पुणेकरांसाठी महत्वाच बातमी आहे. विशेषता दिवेघाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही कामाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज ६ चे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयामार्फत सुरु आहे. त्यामुळे दिवेघाटातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पालखी मार्ग रूंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी खडकामध्ये ब्लास्टींगचे काम करणे गरजेचे असल्याने खडक ब्लास्टींगचे काम पोलिस प्रशासनाच्या नियंत्रणामध्ये सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील दिवे घाटातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिस यंत्रणेच्या परवानगीनुसार ज्या दिवशी ब्लास्टींग करण्यात येईल त्या दिवशी दिवेघाटातील वाहतूक सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. दिवेघाटातून (दोन्ही बाजूने) प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या दिवशी पर्यायी वाहतूक मार्गावरून प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
कात्रज बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. १३१) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. ११९) मार्गे सासवड, त्याच प्रमाणे हडपसर-उरळी कांचन शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. ६१) सासवड अशा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे, आवाहन प्रकल्प संचालक पुणे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.