Ajit Pawar  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : चंद्रकांत पाटलांना अजून पुणेकर कोल्हापूरचे समजतात; अजित पवार असे का म्हणाले?

Ajit Pawar on Chandrakant Patil : पुण्यात आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: राज्यातील महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून तिन्ही पक्षात आलबेल असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. 'चंद्रकांतदादांना अजून पुणेकर कोल्हापूरचे समजतात. मुख्यमंत्री जरा लक्ष घाला, असं अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं.

पुण्यात आज लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा यंदाच्या वर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आज १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०५ वी पुण्यतिथी दिवशी प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाच्या आधी सूत्रसंचालकांनी पुण्यात दोन दादा आहेत. एक अजितदादा आणि दुसरे रोहितदादा असं म्हटलं. त्यानंतर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने मंचावर दोन दादा आहेत असं म्हटलं आहे. चंद्रकांतदादांना अजून पुणेकर कोल्हापूरचे समजतात. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे'.

अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल की, 'तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊ दिलं नाही ना" लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, 'आपण एकत्र येणार होतो, तेव्हाच ठरलं होतं की, मीच पालकमंत्री असेल, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना पुन्हा चिमटा काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रवी राणा यांच्या भेटीला

Team India: T20 वर्ल्ड कपपासून ते न्यूझीलंडची टूर...; 2026 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल टाइट, पाहा कधी आणि कोणासोबत खेळणार?

Post Office Scheme: पोस्टाची खास योजना! फक्त व्याजातून कमवा ५० लाख; कॅल्क्युलेशन वाचा

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने फेटाळली VVIP ची तिसरी बायको होण्याची ऑफर, अब्जाधीश दरमहा देणार होता 11 लाख

Kolambi Fry Recipe: कोळंबी कुरकुरीत फ्राय कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT