स्वत:च्या पैशाने बुस्टर डोस घेणाऱ्यांना थांबवणार नाही : अजित पवार Saam tv news
मुंबई/पुणे

स्वत:च्या पैशाने बुस्टर डोस घेणाऱ्यांना थांबवणार नाही : अजित पवार

पुणे जिल्ह्यात ७० लाख लसीकरणाचा ट्प्पा पुर्ण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : 'पुणे जिल्ह्यात ७० लाख लसीकरणाचा ट्प्पा पुर्ण झाला असून आता पुण्यात लसीकरण करताना पहिल्या डोसपेक्षा दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जाणार आहे. जिल्ह्यात आणि शहरात दुसरा डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्याचं धोरण आहे. मात्र ज्यांचे दोनही डोस पुर्ण झाले आहेत आणि त्यांना तिसरा डोस घ्यायचा आहे, त्यांनी स्वत:च्या पैशाने बुस्टर डोस घ्यायचा असेल तर त्यांना आडकाठी आणणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

हे देखील पहा-

आज पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 'गेल्या महिन्यात १६ लाख लोकांचे लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यानंतर पुणे जिल्ह्यात ७० लाख लसीकरणाचा ट्प्पा पुर्ण झाला असून जिल्ह्यात पहिल्या डोसआधी दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाणार आहे. जागतिक स्तरावर सध्या दररोज ५ ते ६ लाखांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. म्हणजेच ही तिसऱ्या लाटेची धोक्याची घंटा आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरु आहेत, ''

जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर काम सुरु आहे. सद्य स्थितीत आपल्या भागात ८९८ कोविड लसीकरण केंद्रे आणि ४०० खासगी केंद्रे आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात किमान एक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे नियोजन केलं आहे. यातील काही प्लांटचं कामदेखील सुरू झाल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT