Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : हल्ली कुणाला भाषणाला बोलवायला भीती वाटते; बारामती, अजित पवार आणि 'ते' विधान

Ajit Pawar on voter turnout: बारामतीमधील मतदानाच्या टक्केवारीवरून 'हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते, असं म्हणत अजित पवारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान पार प्रक्रिया पार पडली. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं. बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.०७ टक्के मतदान झालं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. याचदरम्यान, आज पुण्यात महायुतीची बैठक झाली. बारामतीमधील मतदानाच्या टक्केवारीवरून 'हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते, असं म्हणत अजित पवारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे शहरात आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील हजेरी लावली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली. यावेळी बैठकीत पुण्यातील महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. येत्या १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडतंय, त्याच्या संदर्भात रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत अजित पवारांनी बारामतीत कमी झालेल्या टक्केवारीवरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवार यांनी खंत बोलून दाखवली. 'हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते, अशा शब्दात अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबतचं 'ते' विधान भोवल्याची अजित पवारांच्या मनात अजूनही शंका आहे, असं बोललं जात आङे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी काही आठवड्यांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांबाबत वक्तव्य केलं होतं. शरद पवार यांचा पराभव हा आम्हाला जास्त वजनदार वाटतो. राज्यात 2019 मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविलं. PM मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली. आता संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा आहे, इतना काफी है...बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

SCROLL FOR NEXT