Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, महाविकास आघाडीत...'

'महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद आहे, त्यांना ती जागा मिळावी, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune News: दिवंगत नेते भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत केली आहे. याच पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद आहे, त्यांना ती जागा मिळावी, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत केली आहे. अजित पवार म्हणाले, 'पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षाला बोलण्याचा अधिकार आहे'.

राष्ट्रवादीच्या बैठकीच्या चर्चेवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ' राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक नाही. ही धादांत खोटी माहिती आहे. रयत शिक्षण संस्थेच्या निवडीबाबत बैठक आहे. यासाठी राज्यातील बरेच जण आले आहेत'.

तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत घोषणा केली आहे. आता कोण म्हणतंय इतके उभे करणार, कोण म्हणतय तितके उभे करणार. कोण म्हणतं एकटं उभं राहणार, आता हे प्रत्येकाचे म्हणणे आहे'.

काही मंदिरात तोकडे कपड्यावर बंदी घातली आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ' वर्षानुवर्षे जसे कपडे परिधान केले जातात. तसेच कपडे आणि गणवेश परिधान करावेत. आता मंदिरात कोणते कपडे घालावे? आता परराज्यातील कोणी लुंगी घालून आलं तर, आपण त्यांना येऊ देणार नाही का? फक्त तोकडे कपडे कोणी घालून येऊ नये'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crispy Poha Vade Recipe: कांदापोहे खाऊ कंटाळा आला? मग सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा वडे, सोपी आहे रेसिपी

IPL Point Table: पावसामुळे IPLच्या पॉईंट्स टेबलवर मोठी उलटफेर; कोणत्या संघाचं बिघडलं गणित? कोण-कोणत्या संघाच्या पॉईंट्सवर फेरलं पाणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ मोठा राडा; माथेफिरूने १० ते १२ गाड्या फोडल्या

Mumbai : "मी पोलिस अधिकारी बोलतोय..." मुंबईतील तरुणीची क्रिकेटरकडून फसवणूक, ३२ लाख उकळले

RBI Repo Rate: कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार? RBI रेपो रेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार

SCROLL FOR NEXT