Ajit Pawar’s outreach to Sharad Pawar’s NCP has intensified political churn in Pune, putting the Maha Vikas Aghadi under pressure. Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

Ajit Pawar–Sharad Pawar Alliance: अजित पवारांनी पुण्यात भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव ठेवला... मात्र याचं प्रस्तावामुळे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झालीय? यासगळ्यात काँग्रेस नेमकी कुठे आहे? काँग्रेस पुण्यात मविआसोबत लढणार की नाही?

Suprim Maskar

भाजपला रोखण्यासाठी अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पुण्यात युती करण्याचा निर्णय घेतला.. त्यासाठी पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही झाली... मात्र अजित दादांच्या याचं खेळीनं महाविकास आघाडीत मात्र वादाची ठिणगी पडली आणि मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसनं मविआशी फारकत घेत स्वबळाचा नारा दिला...

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस युती करण्याची शक्यता होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं काँग्रेसनं अजित पवारांसोबत युती करण्यास थेट नकार दिलाय...तर पुण्यातही ठाकरे बंधू एकत्र लढण्याची शक्यता आहे. ..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या तिढ्यामुळेच मविआला राज्यात चांगलाच फटका बसलाय.. नगरपालिका निवडणुकीतही विरोधकांमधील फाटाफुट महायुतीच्या पथ्यावर पडली होती. त्यात आता अजित पवारही मविआत सहभागी होत असल्यानं महाविकास आघाडीत मात्र बिघाडी निर्माण झालीय. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT