NCP Jammu Kashmir election star campaigner Saam TV
मुंबई/पुणे

जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून २५ स्टार प्रचारकांची घोषणा; मंत्री छगन भुजबळ प्रचाराची राळ उडवून देणार

NCP Jammu Kashmir election star campaigner : अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. यासाटी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे.

Satish Daud

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. यासाटी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या २५ प्रमुख नेत्यांचा समावेश असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचा समावेश आहे.

याशिवाय एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल आदी प्रमुख व्यक्ती देखील जम्मू-काश्मीरमध्ये प्रचार करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मंत्री छगन भुजबळ देखील या ठिकाणी प्रचाराची राळ उडवून देणार आहेत.

या अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मजबूत आणि प्रभावी मोहिम राबवली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे

राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर कोहली, राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीर प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव, राष्ट्रीय सरचिटणीस आणि अल्पसंख्याक अध्यक्ष जलालुद्दीन, पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे.

याशिवाय राष्ट्रीय सचिव श्रीमती रुही अंजुमन, कार्यकारिणी सदस्य पार्थ पवार, ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकर यादव, राष्ट्रीय मिडिया समन्वयक नवीन कुमार, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर (सनी), अल्पसंख्याक विभागाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष फैज अहमद फैज, यांचीही स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

त्याचबरोबर अल्पसंख्याक सेलच्या राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मुमताज आलम रिझवी, जम्मू आणि काश्मीरचे अध्यक्ष डॉ. तारिक रसूल, अध्यक्ष MSME मोहम्मद इक्बाल, काश्मिरी पंडित वेलफेअर सेलचे अध्यक्ष अरुण रैना, सरचिटणीस फैयाज अहमद दार,उपाध्यक्ष हरिस ताहिर भट, सरचिटणीस फिरोज अहमद रंगराज, प्रदेश सरचिटणीस तौसीफ भट्ट, गांदरबल, राज्य सचिव संजय कौल, सदस्य इर्शाद अहमद गनी, सुश्री ऐशिया बेगम, सुश्री सलीमा अख्तर, आदींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT