Ajit Pawar Mission Pimpri Chinchwad municipal elections Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Ajit Pawar Mission Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी आक्रमक रणनीती राबवत एकाच दिवशी भाजप आणि ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

Omkar Sonawane

पिंपरी-चिंचवड :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू करत विरोधकांना एकामागोमाग एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख तथा शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील विविध पक्षांचे पदाधिकारी व माजी लोकप्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, तसेच पिंपरी-चिंचवड विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांचा समावेश आहे. सागर पुंडे यांनीही हातात घड्याळ बांधत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अजित पवार यांचे हे अभियान मिशन पिंपरी-चिंचवड म्हणून ओळखले जात असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, सकाळी ८ वाजल्यापासून अजित पवार पिंपरी-चिंचवडमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

६०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

गेल्या तब्बल १० तासांहून अधिक काळ अजित पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असून आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक इच्छुकांनी त्यांची भेट घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक आहेत. प्रत्येक इच्छुक उमेदवार अजित पवारांकडे जाताना आपला सविस्तर कार्यअहवाल सादर करत आहे. अजित पवार प्रत्येक उमेदवाराकडून त्यांच्या महत्त्वाकांक्षा, प्रभागातील परिस्थिती, राजकीय ताकद, संघटनात्मक काम आणि निवडणूक लढवण्याची तयारी याबाबत सखोल माहिती घेत आहेत.

महापालिका जिंकणे हेच अंतिम लक्ष्य

पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकणे हेच आपले मुख्य लक्ष्य असून त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या रणनीतीमुळे होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला मिळते हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT